‘बेटी बचाओ…बेटी पढाओ’ संदर्भात जिल्हास्तरीय कृतीदलाची बैठक

 


Ø जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

यवतमाळ, दि. 6 : समाजात मुलींच्या जन्माचा दर वाढून लिंग गुणोत्तरात वाढ व्हावी, मुलींच्या जन्माचे स्वागत, ‘बेटी बचाओ….बेटी पढाओ’ यासारख्या उपक्रमांसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त भाऊसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, ‘बेटी बचाओ….बेटी पढाओ’ बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. समाजात मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींकरीता असलेल्या विविध योजनांची माहिती, मुलींची नियमित आरोग्य तपासणी, आदींची माहिती विविध माध्यमातून करावी. यासाठी महिला अधिका-यांसोबतच समाजातील आदर्शवत महिलांनी आणि विद्यार्थीनींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी  केले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जाधव यांनी जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तराबद्दल माहिती दिली. सन 2011 मध्ये जिल्ह्यात दर हजारी पुरुषांमागे 922 महिला असे गुणोत्तर होते. सन 2015 – 196 मध्ये 969 आणि 2019 – 20 मध्ये हे गुणोत्तर 986 आहे. तसेच जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली असून तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय कृतीदलांची स्थापनासुध्दा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी