जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 62.46 टक्के मतदान





 

Ø ग्रामपंचायत निवडणूक

यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 62.46 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतीसाठी एकूण 12 लक्ष 29 हजार 847 मतदार आहेत. यात 5 लक्ष 90 हजार 702 स्त्री मतदार तर 6 लक्ष 39 हजार 137 पुरुष मतदार आणि 8 इतर मतदारांचा समावेश असून आज (दि. 15) झालेल्या निवडणुकीत दुपारी 3.30 वाजेपर्यंत एकूण 7 लक्ष 68 हजार 139 मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी 62.46 आहे. मतदान केलेल्या मतदारांमध्ये 3 लक्ष 93 हजार 228 स्त्री मतदार, 3 लक्ष 74 हजार 910 पुरुष मतदार आणि एक इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची अंतिम आकडेवारी उशिरा प्राप्त होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी