सावित्रीबाई फुलेंचे कार्य समाजाला दिशा देणारे - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

v जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
यवतमाळ दि. 03 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या केवळ एक शिक्षिका नाही तर थोर समाजसुधारक होत्या. समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरा यांच्याविरुध्द त्यांनी लढा देऊन समाजसुधारणेचे मोठे कार्य केले आहे. आजही त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन आदी उपस्थित होते.
आजच्या समाज जीवनात सावित्रीबाईंचे विचार आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या वेळेस पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली त्यावेळेस त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अशाही परिस्थितीत त्यांनी संघर्ष करून समाजाला शिक्षित केले. सोबतच समाजातील सती प्रथा बंद करून विधवा पुनर्विवाहाला संमती देण्यासारखे अनेक क्रांतीकारी पाऊले उचलली, असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह उपस्थित अधिका-यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी पुरवठा विभागातील छाया गुघाणे यांनी सावित्रीबाईंचा जीवन परिचय उपस्थितांना सांगितला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                            0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी