“आपले पोलिस” लोकराज्य विशेषांक उत्कृष्ट व वाचणीय

v पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते प्रकाशन
यवतमाळ, दि. 17 जनतेच्या सेवेसाठी पोलिस विभाग हा नेहमीच तत्पर आहे. पोलिस विभागाच्या सकारात्मक बाबी नियमित प्रकाशित होणे गरजेचे आहे. जानेवारी महिन्याच्या आपले पोलिस, आपली अस्मिता या लोकराज्य विशेषांकांत पोलिसांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. हा विशेषांक उत्कृष्ट व वाचणीय आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने वतीने जानेवारी 2018  या महिन्याच्या लोकराज्य विशेषांकाचे पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, पोलिस उपअधिक्षक पियुष जगताप, उपअधिक्षक (गृह) सेवानंद तामगाडगे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
लोकराज्यच्या माध्यमातून जनतेमध्ये पोलिसांच्या सकारात्मक बाबी पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, हे कौतुकास्पद आहे, असे यावेळी पोलिस अधिक्षक एम. राजकुमार म्हणाले. पोलिस विभागासाठी असलेल्या योजना, सायबर गुन्हे, डिजीटल तपासाच्या स्मार्ट दिशा, गुन्हे सिध्दीचे शास्त्रीय तंत्र, सायबर युगाची आव्हाने, त्याचा पाठलाग, सागरी सुरक्षिततेची सज्जता, गृहरक्षक दल, प्रेरणादायी उर्जा, संधी न्यायाची, 24 तास आपल्या सेवेत, दक्षता यासह वनवैभव आणि निसर्ग पर्यटन, सुरक्षित वीज सुरक्षित जीवन, आर्थिक स्वावलंबन ते यशस्वी उद्योजिका, रोपवाटिका ते ट्री मॉल असे विषय सुध्दा लोकराज्यत समाविष्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे उत्कृष्ट छायाचित्रांचा यात समावेश करण्यात आला आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी