गरीब व गरजू व्यक्तिंसाठी जीवनावश्यक वस्तुंची कीट द्या



v दानशूर व्यक्ती व सामाजिक संघटनांना प्रशासनाचे आवाहन
यवतमाळ, दि. 22 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रभावित व्यक्तिंना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, व्यावसायिक, उद्योजक, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आदी जण आपापल्या परीने समोर येऊन मदत करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातसुध्दा हे मदतकार्य सुरू आहे. मात्र तरीसुध्दा या संकटामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तिंसाठी सामाजिक संघटना, उद्योजक, दानशूर व्यक्तिंनी जीवनावश्यक वस्तुंची किट उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोरोनाच्या संकटामधून सावरण्याकरीता गोर गरीब तसेच गरजू व्यक्तिंना द्यावयाच्या जीवनावश्यक किटमध्ये 10 किलो गहू आटा, 3 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 100 ग्रॅप चहापुडा, 200 ग्रॅम मिरची पावडर, 100 ग्रॅप हळद, 1 मीठ पुडा, 1 किलो तूर डाळ, 1 किलो तेल, 1 किलो चना, 1 किलो मटकी, 2 साबण या वस्तु असल्यास गरजूंना मदत होऊ शकते.
वरील सर्व वस्तु असलेली धान्यकिट सामाजिक संस्था, व्यावसायिक प्रतिष्ठान, औद्योगिक संकूल, दानशूर व्यक्तिंनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे उपलब्ध करून द्यावी. या धान्य किटवर संबंधितांनी आपला लोगो वापरला तरी हरकत नाही. सदर धान्य किट जिल्हा प्रशासनाकडून गरजू व्यक्तिंना वाटप करण्यात येईल. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून संबंधितांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी