कोरोना : पालकमंत्र्यांनी दिला 50 लाखांचा आमदार निधी


v वैद्यकीय यंत्रसामुग्रीकरीता इतरही आमदारांनी निधी देण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 3 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात अत्यावश्यक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीकरीता राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 50 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या पत्रात पालकमंत्री श्री. राठोड यांनी रुग्णालयांमध्ये आयसीयु व्हेंटिलेटर, विलगीकरण कक्ष तयार करणे तसेच वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदी करण्याकरीता करावा, हा निधी मंजूर करावा, असे म्हटले आहेत.
‘महाराष्ट्र कोव्हिड – 19’ उपाययोजनेंतर्गत जिल्हा पातळीवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीला बळ देण्यासाठी एक वेगळी विशेष बाब म्हणून ‘आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2019-20 व 2020-21’ अंतर्गत  वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य तात्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतरही आमदारांनीसुध्दा आपला निधी या कामाकरीता द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी