जीवनाश्यक वस्तु : 30 एप्रिलपासून दुकानाची वेळ आता सकाळी 8 ते 12


v यवतमाळ शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व शहरी व ग्रामीण भागासाठी आदेश
यवतमाळ, दि. 29 : यवतमाळ जिल्ह्यात नागरिकांचे रिपोर्ट सतत पॉझेटिव्ह येत असल्यामुळे 28 व 29 एप्रिल 2020 रोजी यवतमाळ शहरातील अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने दुपारी 12 ते 3 कालावधीत सुरु ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. तसेच जिल्ह्यातील सर्व बँकेचे कामकाज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत प्रशासनाने आदेशित केले होते. मात्र यात आता 30 एप्रिलपासून बदल होणार असून जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ठिकाणची अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने व बँकांचे कामकाज एकाच वेळी सुरु ठेवण्याबबात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बुधवारी बैठक घेऊन निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिनांक 30 एप्रिल 2020 पासून खाली नमुद केलेल्या वेळेनुसार वस्तुंची सेवा, दवाखाने, बँका सुरु ठेवण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे.
किराणा माल, धान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला व फळे, अंडी, मांस, मासे, पशुखाद्याची दुकाने, पिठाची गिरणी, पिण्याच्या पाण्याचे दुकान व वाटप (ॲक्वा सेंटर), कृषी सेवा केंद्राची दुकाने, कृषीयंत्र सामग्रीची दुकाने व त्याच्या सुटे भागाची दुकाने (त्याचा पुरवठा साखळीसह) त्यासंबंधीचे दुरुस्तीचे दुकाने, रासायनिक खताची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. दुध व दुग्धजन्य पदार्थाची दुकाने (स्थायी दुकाने व फिरते विक्रेता) सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, दुध विक्री (फक्त फिरते विक्रेता) सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत (फक्त पायदळ, सायकल किंवा दुचाकी वाहनाने दुधाची घरोघरी जाऊन विक्री करावी लागेल). दवाखाने, औषधी दुकाने, चष्माघर, पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांची औषधे दुकाने 24X7 सुरु राहतील. किराणा दुकानदार व इतर दुकानदार ह्यांना त्यांच्या दुकानात माल भरणे किंवा माल उतरविणे इत्यादी कामे सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, पेट्रोलपंप सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत (अत्यावश्यक सेवेकरीता 24X7 सुरु राहतील), जिल्ह्यातील सर्व बँकेचे कामकाज (ग्राहकाकरीता) सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत  (बँकेचे इतर कार्यालयीन कामकाज त्याच्या बँकेचे वेळेनुसार 10 टक्के अधिकारी / कर्मचारी उपस्थित ठेवून पार पाडण्यास मुभा राहील.),एल.पी.जी.गॅस एजंन्सी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कार्यालय सुरु राहील. (घरोघरी गॅस वाटप 24X7 सुरु राहील.)
वरील मुभा देण्यात आलेल्या वेळेतच वरील वस्तुंची सेवा सुरु राहील. सदर दुकानदार यांनी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही तसेच ग्राहकामध्ये सामाजिक अंतर राहील, याबाबत दक्षता घ्यावी. दुकानामध्ये हात स्वच्छ धुण्याकरीता हॅन्डवॉश, सॅनिटायझर इत्यादी साहित्य ठेवावे. वस्तुंची सेवा पुरविणारे व ग्राहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. सदर आदेश यवतमाळ शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व नागरी व ग्रामीण भागास लागू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
यवतमाळ शहरात टु-व्हिलर वाहनांना पुढील आदेशापावेतो पुर्णपणे बंदी ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. सदर आदेशामध्ये अंशत: बदल करून यवतमाळ शहरातील टु-व्हिलर वाहनांना ठराविक वेळेत मुभा देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त यवतमाळ शहरात टु-व्हिलर वाहनांना बंदी राहणार असून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त यवतमाळ शहरात टु-व्हिलरने कोणी फिरतांना आढळल्यास अशा व्यक्ती विरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. (अत्यावश्यक अधिकारी, कर्मचारी व अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात आलेले नागरिक व स्वयंसेवक यांना सुट राहील.)
वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1857, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
०००००००

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी