14 पॉझेटिव्ह रुग्णांसह आयसोलेशन वॉर्डमध्ये 233 जण भरती


v आज तपासणीसाठी पाठविले 127 नमुने
यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात गुरुवारी नव्याने आठ पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 14 झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या नागरिकांना प्रशासनाने ताब्यात घेतले असून त्यांना आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात एकूण 233 जण भरती असून यात 14  पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
गत 24 तासात 101 जण नव्याने भरती असून असून शुक्रवारी एकूण 127 जणांचे नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविण्यात आले आहे. तर शनिवारी सकाळी जवळपास 150 लोकांचे नमुने पाठविण्यात येईल. संस्थात्मक विलगीकरणात 134 जण तर गृह विलगीकरणात एकूण 795 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या 862 आहे. यापैकी आतापर्यंत 711 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. आज पाठविलेले 127 रिपोर्ट अप्राप्त आहेत.
पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीने समोर येऊन प्रशासनास माहिती द्यावी. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी आपल्या घरातच राहावे. शासन व प्रशासनाच्या दिलेल्या सुचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी