आयसोलेशन वॉर्डात आठ पॉझेटिव्ह रुग्ण



v सद्यस्थितीत एकूण 46 जण भरती
यवतमाळ, दि.19 :  वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डातून शनिवारी चार पॉझेटिव्ह रुग्णांना सुट्टी दिल्यानंतर ही संख्या सहा वर आली होती. मात्र काही दिवसांपासून भरती असलेल्या दोन जणांचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने आता आयसोलेशन वॉर्डात एकूण आठ पॉझेटिव्ह रुग्ण झाले आहेत.
गत काही दिवसांपासून आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या दोन जणांचे नमुने शनिवारी रात्री वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. हे दोघेही इतर पॉझेटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण आठ झाली आहे.
आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत एकूण 46 जण भरती आहे. शासकीय महाविद्यालयाला एकूण 37 रिपोर्ट प्राप्त झाले असून यापैकी 35 निगेटिव्ह तर दोन पॉझेटिव्ह आहेत. रविवारी एकूण 16 नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविण्यात आले आहे. गत 24 तासात 14 रुग्ण भरती झाल्याचे वैद्यकीय प्रशासनाने सांगितले.
जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या 768 असून संस्थात्मक विलगीकरणात 37 जण आहेत. पॉझेटिव्ह असलेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून यंत्रणेसमोर येऊन आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0000000

Comments

  1. kuthla ahe positive rugn te sangtishivay kas kalnar tyachya smprkat aalo kiva nhi

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी