पॉझेटिव्ह नमुने असलेल्या नागरिकांची तब्बेत चांगली



v आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 88 जण भरती
v युध्द जिंकण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
       यवतमाळ, दि.9 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 88 जण भरती आहेत. यापैकी पॉझेटिव्ह असलेल्या आठही जणांची प्रकृती चांगली असून त्यांना लक्षणे नाही. तसेच त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
            भरती असलेल्या एकूण 88 लोकांपैकी 78 लोकांचे नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. यात काल निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या नागरिकांच्या नमुन्यांचासुध्दा समावेश आहे. पॉझेटिव्ह असलेले हे नागरिक शहरातील जाफर नगर, इंदिरा नगर, मेमन सोसायटी, गुलमोहर कॉलनी तसेच नेर, बाभूळगाव व सावर येथे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रशासनाला आतापर्यंत अशा 47 लोकांचा शोध घेण्यास यश आले असून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात येईल. तसेच त्यांचे नमुने तपासणीकरीता नागपूर येथे शुक्रवारी पाठविण्यात येणार आहे.
            पॉझेटिव्ह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात आणखी काही लोक आले असतील तर त्यांनी स्वत:हून यंत्रणेसमोर यावे व आरोग्य तपासणी करून घ्यावी. जेणेकरून स्वत:च्या आणि इतरांच्याही आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य राहील व या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला प्रतिबंध करता येईल. यवतमाळ शहरातील प्रतिबंध करण्यात आलेल्या भागासाठी प्रत्येकी 30 आरोग्य कर्मचा-यांच्या तीन टिम तयार करण्यात आल्या आहेत. या भागात 6827 घरे असून 33045 लोकसंख्या आहे. आरोग्य विभागाच्या टीममार्फत ‘डोअर टू डोअर’ सर्व्हे करून सर्व लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . खोकला, ताप, श्वसनाचा त्रास किंवा कोव्हिड संदर्भात इतर एक-दोन लक्षणे आहे काय, याबाबत पुढील 14 दिवस हा सर्वे या भागात सुरू राहील.
            कोव्हिड – 19 चे हे युध्द जिंकण्यासाठी सर्व नागरिकांना शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे व सोशल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोरपणे अंमलात आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
            जिल्ह्यात 97 जण गृह विलगीकरणात असून 11 जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी