आयसोलेशन वॉर्डतील 11 जणांना सुट्टी



सध्यास्थितीत 62 जण भरती
यवतमाळ, दि. 17 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या 11 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून यापैकी दोन जणांना गृह विलगीकरणात तर नऊ जणांना संस्थात्मक विलागिकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
सध्यास्थितित आयसोलेशन वार्डमध्ये 62 जण भरती आहेत. गत 24 तासात 3 जण आयसोलेशन वार्डमध्ये भरती झाले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला आज 42 रिपोर्ट्स प्राप्त झाल्या असून त्या सर्व नेगेटिव्ह आहे. तर नागपूर येथील एम्स लैब येथे 69 रिपोर्ट्स प्रलंबित आहे. शुक्रवारी 38 नमूने तापसणीसाठी नागपुरला पाठवण्यात आले आहे. गृह विलगीकरणात जवळपास 667 जण आहेत. संस्थात्मक विलगीकरणाअंतर्गत अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृहात 104 जण तर समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात 33 जण आहेत. 
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी