विलगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांची प्रकृती चांगली



v एकूण 40 जण दाखल, गृह विलगीकरणात 103 जण
यवतमाळ, दि. 3 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात एकूण 40 जण भरती असून त्यांची प्रक्रृती चांगली असल्याचे डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. यापैकी 31 जणांचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिलेच पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी 9 जणांचे नमुने पाठविण्यात आले असून सर्वांचे रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहे. संपूर्ण जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 103 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात 230 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांनी किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून समोर येऊन प्रशासनाला याबाबत माहिती द्यावी. बाहेरून आलेल्या ज्या नागरिकांनी अद्यापही प्रशासनाशी संपर्क साधला नाही, त्यांनी 07232- 240720, 07232- 239515 तसेच टोल फ्री क्रमांक 104 त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी