जिल्ह्यातील 2.87 लक्ष उज्वला ग्राहकांना मोफत सिलेंडर



यवतमाळ, दि. 2 : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने प्रधानमंत्री  उज्ज्वला योजनेतील सर्व ग्राहकांना पुढील तीन महिन्यांकरिता म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 पर्यंत विनामूल्य रिफिलची घोषणा केली आहे.  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या आठ कोटी लाभार्थ्यांना घरगुती एलपीजी सिलिंडरचा लाभ विनामूल्य मिळणार असून यात यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 87 हजार 40 लाभार्थीचा समावेश आहे. 
या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यातील घरगुती सिलिंडरचा रिफिल खर्च उज्ज्वला लाभार्थ्यांच्या लिंक बँक खात्यात आगाऊ जमा केली जाईल. प्रत्येक उज्वला ग्राहकांना दरमहा एक मोफत रिफील सिलिंडर मिळेल. लाभार्थी अंतिम रिफिल मिळाल्यानंतर केवळ 15 दिवसानंतरच पुढील रिफिल बुक करू शकतो. मात्र बुकिंग नोंदणीकृत मोबाईल नंबर द्वारे करणे आवश्यक आहे.
   तेल कंपन्यांचे एलपीजी  भरणारे केंद्र सुरळीतपणे कार्यरत आहेत.  सर्व एलपीजी भरणा केंद्रात पुरेसा एलपीजी साठा असून  महानगरपालिकेच्या एलपीजी वितरकांचा साठाही चांगला आहे आणि त्यात कोणतीही कमतरता नाही. म्हणून एल.पी.जी.  रिफील प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या एलपीजी वितरकांच्या शोरूम आणि गोदामांना भेट देण्याची आवश्यकता नाही.
 तेल कंपनीत कार्यरत कर्मचारी, शोरूमचे कर्मचारी, एलपीजी वितरण कर्मचारी, वखार-रखवालदार, एलपीजी मेकॅनिक आणि रिटेल आउटलेट, ग्राहक परिचर,  ट्रक चालक यांना या कठीण काळात सेवा देताना  कोरोनामुळे बाधीत होऊन  मृत्यू झाल्यास अशा कामगारांच्या वारसदाराला रु. पाच लाख सानुग्रह मदत  जाहीर केली आहे.  वारसदार नसल्यास मृताच्या कुटूंबाला पैसे दिले जातील, असे हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन चे नोडल अधिकारी विशाल सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी