आयसोलेशन वॉर्डमधून दोन पॉझेटिव्ह रुग्णांना सुट्टी


v सात पॉझेटिव्हसह एकूण 40 जण भरती
यवतमाळ, दि.20 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या दोन पॉझेटिव्ह रुग्णांचा दुसरा आणि तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र दोघांनाही पुढील 14 दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीखाली संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. सद्यस्थितीत आता आयसोलशन वॉर्डमध्ये सात पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण 40 जण भरती आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी चार पॉझेटिव्ह रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे हा आकडा सहा वर आला होता. लगेच दोन पुन्हा पॉझेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यामुळे पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या आठ झाली. यात सोमवारी दुपारी पुन्हा एका रुग्णाची भर पडून एकूण संख्या 9 झाली होती. मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत दोन पॉझेटिव्ह रुग्णांचे उर्वरीत नमुने निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डात आता सात पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 16 पर्यंत गेला असून यापैकी 9 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. गत 24 तासात एक नागरिक भरती झाला आहे. संस्थात्मक विलगीकरणात एकूण 142 जण तर गृह विलगीकरणात एकूण 789 जण आहेत. सद्यस्थितीत एकूण 17 लोकांचे नमुने अप्राप्त आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोपर्यंत मानवी साखळी तुटणार नाही, तोपर्यंत नागरिकांनी घरातच राहावे. अनावश्यक बाहेर पडू नये. अत्यावश्यक खरेदी करण्याकरीता बाहेर आले तर सोशल डिस्टंन्सिंग पाळणे गरजेचे आहे. शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करा. आपला जिल्हा रेड झोनमध्ये गेला असून तो ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी