कामगार नोंदणी नुतणीकरणची अट शिथील करा



v पालकमंत्र्यांचे कामगारमंत्र्यांना पत्र
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड 1 जून 2018 पासून नुतणीकरण करण्यात आलेले नाही. यातील अनेक बांधकाम कामगारांनी नोंदणी कार्ड नुतणीकरण करण्याचा प्रयत्न केला परंतु यवतमाळ जिल्ह्यात गत वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या निवडणुकांची आचारसंहिता आणि आता कोरोनाचा संसर्ग यामुळे या कार्डांचे नुतणीकरण करण्याचे राहिले आहे. त्यामुळे कामगारांच्या नोंदणीकार्डच्या नुतणीकरणाची अट शिथिल करण्याबाबत राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे.
 यवतमाळ जिल्ह्यात मध्यंतरीच्या कालावधीत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका, तद्वनंतर यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची पोट निवडणूक तसेच जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची आदर्श आचारसंहिता असल्यामुळे बांधकाम मजूरांना ऑनलाईन पध्दतीने कार्ड नुतणीकरण करता आले नाही. सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कामगार अधिकारी यांनी कार्ड नुतणीकरण करण्याची कार्यवाही बंद केली आहे. याशिवाय आवश्यक सुविधा, अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कारणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे अद्यापही 80 टक्के कार्ड नुतणीकरण करण्यात आले नसून आता नुतणीकरण होण्याची शक्यता नाही. अनेक बांधकाम कामगाराचे कार्ड नुतणीकरण न झाल्यास त्यांना शासनाच्या पुढील योजनेचा फायदा होणार नाही. तेव्हा वरील सर्व बाबीचा विचार करून यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे कामगार कार्ड 1 जून 2018 पासून, नुतणीकरणची असलेली अट शिथील करून यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम मजूरांना दिलासा द्यावा, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी कामगार मंत्र्यांना पत्राद्वारे कळविले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी