आयसोलेशन वॉर्डतील 118 लोकांचे रिपोर्टस नेगेटिव्ह



v 26 जणांना सुट्टी
यवतमाळ, दि. 16 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या 118 लोकांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले असून 26 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना गृह विलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.
गत 24 तासात 3 जण आयसोलेशन वार्डमध्ये भरती झाले आहेत. सध्यास्थितीत एकूण 75 जण भरती आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 118 निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले, तर 13 रिपोर्टचे निश्चित काही सांगता येत नसल्यामुळे हे 13 नमूने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. 
आयसोलेशन वार्डमध्ये पॉझेटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 10 आहे. गुरुवारी एकूण 136 नमूने तापसणीसाठी नागपुरला पाठविण्यात आले आहे. गृह विलगीकरणात एकूण 152 जण असून संस्थात्मक विलगीकरणाअंतर्गत अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृहात 104 जण ठेवण्यात आले आहे. 
००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी