तर…. मास्क न लावणा-यांविरुध्द होणार कारवाई



v जिल्हाधिका-यांच्या पोलिस अधिक्षकांना सुचना
       यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा (कोव्हिड - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच मानवी साखळी तोडण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीसुध्दा यवतमाळ शहरातील काही नागरिक मास्क न लावता शहरामध्ये विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयाला दिले आहे.
            मास्क न लावता शहरात विनाकारण फिरणा-या नागरिकांवर दंडाची कमीतकमी रक्कम निश्चित करून सदर रक्कम एकरकमी वसूल करावी. तसेच त्याबाबत त्यांना रक्कम भरल्याची पावती द्यावी. एकाच नागरिकावर एकापेक्षा जास्त वेळा दंडाची रक्कम आकारण्यात आली असेल अशा नागरिकांना शहरामध्ये फिरण्यास मज्जाव करावा. तसेच नागरिकांना याकरीता मारहाण करू नये, अशा सुचना आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचा-यांना द्याव्यात, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी पोलिस अधिक्षकांना केल्या आहेत.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी