मोफतचे तांदुळ कमी दिल्याने रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द



यवतमाळ, दि.19 :  धान्य दुकानात आढळुन आलेल्या अनियमिततेवरून तसेच एकूण सहा कार्डधारकांना ३० किलो मोफतचे तांदुळ कमी दिल्याने दिग्रस येथील गांधीनगर येथे बेबी चव्हाण यांच्या मालकीच्या रास्त भाव धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रदद करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण अनामत रक्कम शासन जमा करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांच्या सुचनेनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी एस. बी. भराडी यांनी दिले आहेत.
मौजा गांधीनगर ता. दिग्रस येथील रास्तभाव दुकानदार बेबी. चव्हाण यांच्या विरुद गावातील नागरीकांच्या प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने दिग्रस येथील नायब तहसिलदार यांनी दिनांक 18 एप्रिल रोजी दुकानात प्रत्यक्ष भेट देवून कार्डधारकांचे बयान नोंदवून घेतले. दुकानातील कागदपत्रांची तपासणी केली असता रास्तभाव दुकानदार यांनी एकूण 6 कार्डधारकांना 30 किलो मोफतचे तांदुळ कमी दिले. तसेच साठा रजिस्टर व विक्री रजिस्टर अदयावत न करणे, साठाफलक न लावणे, दुकानात तक्रार पुस्तिका न ठेवणे, भाव फलकावर भाव नमुद नसणे, कार्डधारकांचे सोबत समन्वयाची भाषा न वापरणे व कार्डधारकांना धान्य कमी देणे इत्यादी गंभीर स्वरुपाच्या अनियमितता आढळून आल्या. त्यामुळे तहसिलदार दिग्रस यांनी रास्त भाव धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रदद करण्याकरीता प्रस्तावित केले.  
परवानाधारक यांनी महाराष्ट्र अनुसुचित वस्त् वितरणाचे विनियमन 1975 व त्या अंर्तगत मंजुर करण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे सिध्द होत असल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी एस. बी. भराडी यांनी रास्त भाव धान्य दुकानदार बेबी. बी. चव्हाण, दिग्रस यांच्याकडील रास्त भाव धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रदद करुन संपुर्ण अनामत रक्कम शासन जमा करण्याचे आदेश दिले. तसेच शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून सदरच्या रास्त व धान्य दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानास जोडुन त्यांना शिधावस्तुंचे वितरण नियमितरित्या होईल, या दृष्टीकोणातुन पुढील कार्यवाही करण्याचेही निर्देश तहसीलदारांना दिले आहेत.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी