संचारबंदीचे उल्लंघन करणा-या ढाबाचालकांवर गुन्हा दाखल

           
यवतमाळ दि.  1 : कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करून ढाबा चालविणा-या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरिक्षक संजय शिरभाते तसेच तहसिलदार कुणाल झाल्टे हे कर्मचाऱ्यांसह  यवतमाळ-मांगुळकडे पेट्रोलिंग करीत असतांना मांगुळकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर असलेल्या निसर्ग ढाबा, तंदुर ढाबा, तसेच जय मातादी ढाबा येथे लोकांची गर्दी आढळून आली. 
तंदुर ढाबा चालक अनिल वसंतराव इंगळेकर रा. आनंदनगर उमरसरा यवतमाळ, निसर्ग ढाबा चालक अनिल नारायण डिवरे रा. भांबराजा आणि जय माता दी ढाबा चालक मधुकर भाउरावजी सोननकर रा. भांबराजा हे तिघेही कोरोना विषाणु संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करतांना आढळले. सदर तिनही व्यक्ती आपल्या ढाब्यातून मालाची विक्री व सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून चेहऱ्याला  मास्क न लावता मानवी जीवित व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल, असे कृत्य करून संसर्ग पसरविण्याची घातक कृती करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ  यांच्या मनाई आदेशाचेसुध्दा उल्लंघन केले.
त्यामुळे वर नमुद आरोपींना पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नुरुल हसन,  उपविभागीय पोलिस अधिकारी माधूरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात ढाबा चालका विरूद्ध कलम 180 भादंवी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र कोविड- उपाय योजना 2020 चे कलम 11 तसेच कलम 135 मपोका अन्वये कार्यवाही करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे, असे  पोलिस निरीक्षक संजय शिरभाते यांनी कळविले आहे.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी