दुकाणात दरफलक नसल्याने दोन हजार रुपये दंड



            यवतमाळ दि.१७ : वणी येथील प्रा. संजय तारूण यांच्या मालकीचे मे. प्रकाश ट्रेडर्स येथे दुकाणाच्या दर्शनी भागात कोणत्याही प्रकारचा दरफलक लावण्यात आलेला आढळून न आल्याने सदर दुकानदारास रुपये दोन हजाराचा दंड ठोठावण्यात आला. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे प्राप्त एका तक्रारीनुसार त्यांच्या आदेशान्वये दुकाणात प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असता वणीचे उपविभागीय अधिकारी यांनी वरील कारवाई केली असल्याचे तहसिलदार वणी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केलेल्या अहवालात कळविले आहे.
मुळ तक्रारीनुसार मे. प्रकाश ट्रेडर्स या दुकाणात दरफलक लावण्यात आला नव्हता. तक्रारदार यांचे म्हणणेनुसार रसोया ईडीबल ऑईल चे १५ लीटर डब्यावर१६९९ रुपये दर टाकण्यात आला होता. सदर परवानाधारकाने उपरोक्त डब्याचे १४४० रुपये आकारले. तसेच मुळ बिलात १३९० रुपये इतकी किंमत असल्याचे नोंद आहे. सदर डब्यावरील मुळ एम.आर.पी. मध्ये खाडाखोड १६९९ रुपये नोंद आहे. सदर परवानाधारक यांनी एका डब्यावर ३० ते ४० रुपये वाढवून नफा घेत असल्याचे सांगितले. मुळ बिलामध्ये तेलाची किंमत डब्यासोबत येत असल्याचे दिसले, यामध्ये वाहतुक खर्च लावल्याचे दिसून आढळून आले नाही.
००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी