बँकांच्या वेळा आता दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत


यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात 15 एप्रिल 2020 नुसार दिनांक 3 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच संचारबंदीच्या कालावधीमध्ये जीवनाश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा सुरु ठेवण्याबाबत प्रतिबंध करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बँकेत ग्राहकांची गर्दी होत असल्यामुळे सर्व बँकाच्या कामकाजाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. मात्र यवतमाळ शहरात रुग्णांचे रिपोर्ट सतत पॉझिटीव्ह येत असल्यामुळे दिनांक 28 व 29 एप्रिल 2020 रोजी यवतमाळ शहरातील बँकेच्या कामकाजाची वेळ दुपारी 12 ते दुपारी 3 पर्यंत सुरु ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या बँकेच्या कामकाजाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असल्यामुळे बँकेच्या आर्थिक व इतर कामात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे सर्व बँकेच्या कामकाजात एकसुत्रता राहण्याचे दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बँकेचे व्यवहार एकाच वेळी सुरु ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 मधील खंड 2, 3 व 4 व महाराष्ट्र शासनाची दिनांक 14 मार्च 2020 चे अधिसूचनेनुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार जिल्ह्यातील सर्व बँकेचे व्यवहार आदेशाचे दिनांकापासून दुपारी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुढील आदेशापर्यंत सुरु ठेवण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी निर्गमित केले आहे.
सर्व बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक बँकेद्वारे पैसे काढणे, पैसे टाकणे, पैसे पाठविणे तसेच स्वत:च्या खात्यामधील किमान रक्कम तपासणे व काढणे इत्यादी सेवा प्रत्येक ग्राहकाला पुरविण्यात याव्यात. तसेच या व्यतिरिक्त कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात येवू नये. या सुविधा उपलब्ध करून देतांना शासनाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे तंतोतंत पालन करावे. जसे सामाजिक अंतर, बँकेमध्ये हात स्वच्छ धुण्याकरीता हॅन्डवॉश, सॅनिटायझर इत्यादी साहित्य ठेवावे. सदरची जबाबदारी ही बँक व्यवस्थापकाची राहील, असेही आदेशात नमुद आहे.
00000000
वृत्त क्र. 345
यवतमाळ शहरातील पाटीपूरा क्षेत्र प्रतिबंधीत म्हणून घोषित
यवतमाळ, दि. 28 : यवतमाळ शहरातील पाटीपुरा क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात आले आहे. शहरातील प्रभाग क्र.10 मधील इंदिरा नगर, पवारपुरा, भोसारोड, हिंदु स्मशानभुमी परिसर, कोहिनूर सोसायटी, गुलमोहर सोसायटी, शहदाबबाग, रुग्णालय सोसायटी, कापसे ले-आऊट, बिलाल नगर, अलमास नगर, नागसेन सोसायटी सिध्देश्वर नगर समोरचा परिसर शर्मा ले-आऊट ला लागून, तायडे नगर, अस कबीर नगर, बाबा लेआऊट, फैझ नगर, अहैबाब सोसायटी, गुलशन नगर व प्रभाग क्र.20 मधील भोसा गावठाण, गोल्डन पार्क रोड, डेहनकर लेआऊट भाग 1- 2,  सव्वालाखे ले – आऊट, मंगेश नगर, सुंदर नगर, क्रिसेंट शाळा परिसर, मेमन सोसायटी, मालानी झोपडपट्टी, रुक्मीनी नगर, संजय गांधी नगर, बोरूले भाग 2, तांडा वस्ती, डी एड. कॉलेज परिसर, शंभरकर ले-आऊट, अंबर लॉन परिसर, सारस्वत ले-आऊट, प्रभात नगर या भागातील रुग्णांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याबाबतचा पॉझेटीव्ह अहवाल प्राप्त झाल्यामुळे त्याभागास प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करून त्या भागाच्या 3 कि.मी. परिघाच्या सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत.
तसेच हा संसर्ग इतरत्र पसरू नये म्हणून यवतमाळ शहरातील पाटीपूरा भागाच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने यवतमाळ शहरातील पाटीपूरा या भागास प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागातील 3 कि.मी. परिघीय क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्यातबाबत आदेशित करण्यात येत आहे.
या आदेशाचे कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेस्तव कर्तव्य करण्याची मुभा राहील. मुख्याधिकारी, नगर परिषद, यवतमाळ यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना, पासेस निर्गमित कराव्यात. तसेच परवाना, पासेस धाराकांची यादी संबंधीत पोलीस स्टेशन अधिकारी यांना तात्काळ द्यावी. अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतर इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, नगर परिषद, यवतमाळ यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांच्या मार्फत करावी.
वरील आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 188, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी