मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा -पालकमंत्री राठोड


v  मदतीचे चेक प्रशासनाकडे किंवा थेट जमा करण्याची सोय
यवतमाळ, दि. 6 : कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्गामुळे आरोग्यविषयक आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा या कठीण प्रसंगी शासन अणि प्रशासन नागरिकांकरीता अनेक उपाययोजना करीत आहे. शासनाच्या या मदत कार्यात अनेक स्वयंसेवी संस्थांचासुध्दा हातभार लागत आहे. याच पार्श्वभुमीवर आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी, सामाजिक संघटना, नागरिक आदींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे
कोरोना विरुध्दची लढाई जिंकण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक जण आपापल्या परीने सहभागी होत आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस विभाग यासह संपूर्ण गावस्तरावरील यंत्रणा 24 तास कार्यान्वित आहे. नागरिकांनीसुध्दा शासनाच्या व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे. तसेच आपापल्या परीने जेवढी होईल तेवढी आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करावी. वनमंत्री म्हणून वनविभागाला आवाहन केल्यानंतर राज्यातील संपूर्ण वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. आपण सर्वांनीसुध्दा या कामासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.   
यासंदर्भात 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी - कोव्हिड - 19' हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई - 400023 येथे उघडण्यात आले आहे. बचत खाते क्रमांक 39239591720 असून शाखा कोड  00300 तर आयएफएससी कोड SBIN0000300 असा आहे. दिलेल्या या शाखेत नागरिक आपले धनादेश जमा करू शकतात. किंवा रकमेचे धनादेश यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द करू शकतात.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी