जिल्ह्यात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 69 वर


v आयसोलेशन वॉर्डात एकूण 305 जण भरती
यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात विशेषत: यवतमाळ शहरात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. रविवारी 50 पर्यंत असलेला हा आकडा आज 69 वर गेला आहे. रविवारी मध्यरात्री नंतर 5 जणांचे, सोमवारी सकाळी 6 जणांचे तर संध्याकाळपर्यंत 8 जण असे एकूण संपूर्ण दिवसभरात 19 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. सद्यस्थितीत 69 ॲक्टिव्ह पॉझेटिव्हसह आयसोलेशन वॉर्डात एकूण 305 जण भरती आहे.
आयसोलेशन वॉर्डात आज तीन जण नव्याने भरती झाले आहे. आज नागपूरला तपासणीकरीता पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 32 असून सद्यस्थितीत 102 नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.

जीवनावश्यक वस्तुंसाठी तीन तासांची मुभा
तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर यवतमाळ शहरात मंगळवारी आणि बुधवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, किराणा, भाजीपाला, दुध, फळे आदी केवळ दिलेल्या वेळेतच सुरू राहतील. बाजार समितीची ठोक भाजीमंडी मात्र बंद राहणार आहे. तसेच घरोघरी भाजीचे हातठेले फिरविण्यास मुभा राहील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

०००००००
यवतमाळ शहरात दुचाकीला बंदी
यवतमाळ, दि. 27 : गत काही दिवसांपासून यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सहा प्रतिबंधित क्षेत्रापैकी एकाच भागातून हे पॉझेटिव्ह रुग्ण आढळत असल्याने यवतमाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यवतमाळ शहरात दुचाकी वाहन पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे. मात्र यातून अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी व अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात आलेले नागरीक व स्वयंसेवक यांना मुभा राहील.
यवतमाळ शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दुचाकी वाहनांना पुढील आदेशापावेतो पूर्णपणे बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी निर्गमित केले आहे. त्यामुळे वरील आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी