प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक सेवा वगळता निर्बंध कायम


      यवतमाळ, दि. 19 : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 8 एप्रिल रोजीच्या आदेशान्वये यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक 10 व प्रभाग क्रमांक 20 प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात आवश्यक सेवा जसे वैद्यकीय सेवा, कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत सेवा वगळता इतर कोणत्याही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राच्या आत किंवा बाहेर सोडण्यात येऊ नये, असे आदेशित करण्यात आले आहे.
            सोबतच प्रतिबंधित क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. सदर भागात दुध व दुग्धजन्य पदार्थाची दुकाने, पिठ गिरणी, किराणा दुकाने सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सामाजिक अंतर ठेवून सुरू ठेवता येतील. या भागातील नागरिक दुकानांमध्ये पायी जाणे-येणे करू शकतील.  प्रतिबंधित भागात सर्व प्रकारचे खाजगी वाहने फिरविण्यावर बंदी कायम राहील. या भागातील औषधांची दुकाने 24 बाय 7 सुरू राहतील. बँकिंग सेवा पुरविण्यासाठी बँकांना त्यांचे व्यवसायिक प्रतिनिधींमार्फत सेवा पुरविणे बंधनकारक राहील. रेशन, अन्नधान्य, व स्वयंपाकाचा गॅस याबाबत तहसीलदार यवतमाळ व नगर पालिका प्रशासन यांच्यामार्फत घरपोच सेवा पुरविण्याचे निर्देश देण्यात येत आहे.
            वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भादंविचे कलम 188 व इतर कायदे व नियमांतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी आदेशात नमुद केले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी