संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाखांवर दंड वसूल



v 517 प्रकरणामध्ये कारवाई
v मास्क न वापरणाऱ्यांची प्रकरणे सर्वाधिक
       यवतमाळ, दि. 18 : संचारबंदीच्या काळात शासन व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन न करणा-यांविरुध्द प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांकडून दोन लाखांवर दंड वसूल करण्यात आला असून एकूण 517 प्रकरणात ही कारवाई केली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-यांची प्रकरणे सर्वाधिक आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये विविध अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, सामाजिक अंतर ठेवणे, किराणा दुकानात दर्शनी भागात दरपत्रक लावणे यासारख्या विविध सूचनांचा समावेश आहे. तरीदेखील या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 517 प्रकरणात एकूण 2 लाख 11 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 
सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावल्याबद्दल जिल्ह्यातील 447 प्रकरणात प्रती व्यक्ती 200 रुपये प्रमाणे एकूण 89 हजार 400 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल यवतमाळ, पुसद, बाभुळगाव, राळेगाव व नेर तालुक्यातील एकूण 12 प्रकरणात प्रती व्यक्ती 500 रुपये प्रमाणे सहा हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच दुकानांसमोर सामाजिक अंतर न ठेवल्याबद्दल 39 प्रकरणात प्रती व्यक्ती 2 हजार रुपये दंड प्रमाणे एकूण 78 हजार रुपये तर किराणा दुकानात दरपत्रक न लावल्याबद्दल प्रती व्यक्ती 2 हजार रुपये प्रमाणे 19 प्रकरणात 38हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी