यवतमाळ शहरातील प्रभाग क्र.10 व 20 मधील वस्त्यांच्या सीमा बंद


v तीन किमी परिघीय क्षेत्रात संपूर्ण शटडाऊन
v नागरिकांच्या हालचाली, फिरण्यावर निर्बंध
       यवतमाळ, दि.9 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या आठ जणांना कोरोना विषाणू (कोव्हिड - 19) संसर्ग झाल्यामुळे त्यांचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. सदर व्यक्ति हे प्रभाग क्रमांक 10 व 20 मधील असल्याने शहरातील इतर भागात अन्य नागरिकांना कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये, यादृष्टीने या प्रभागातील वस्त्यांच्या क्षेत्रीय सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या आदेशान्वये प्रभाग क्रमांक 10 व 20 मधील वस्त्यांच्या तीन किमी परिघीय क्षेत्रात संपूर्ण शटडाऊन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या हालचाली व फिरण्यावर किंवा अन्य संपर्कावर पूर्णपणे निर्बंध आहेत.
प्रभाग क्रमांक 10 मधील इंदिरा नगर, पवारपुरा, भोसा रोड, हिंदु स्मशानभुमी परिसर, कोहिनूर सोसायटी , गुलमोहर सोसायटी, शहदाबबाग, रुग्णालय सोसायटी , कापसे ले-आऊट, बिलाल नगर, अलमास नगर, नागसेन सोसायटी, सिध्देश्वर नगर समोरचा परिसर शर्मा ले - आऊटला लागून, तायडे नगर, अस कबीर नगर, बाबा लेआऊट , फैझ नगर, अहैबाब सोसायटी, गुलशन नगर व प्रभाग क्र.20 मधील भोसा गावठाण, गोल्डन पार्क रोड, डेहनकर ले-आऊट भाग 1-2, सव्वालाखे ले-आऊट , मंगेश नगर, सुंदर नगर , क्रिसेंट शाळा परिसर, मेमन सोसायटी, मालानी झोपडपट्टी , रुख्मीणी नगर, संजय गांधी नगर, बोरुले भाग 2, तांडा वस्ती, डी. एड. कॉलेज परिसर, शंभरकर ले-आऊट, अंबर लॉन परिसर, सारस्वत ले-आऊट, प्रभात नगर या भागातील केंद्रबिंदू पासून 3 किलोमीटरच्या परिसरापर्यंत नागरिकांची हालचाल, फिरणे, संपर्क यावर निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच या वस्त्यांमधील 3 कि . मी . परिघीय क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेशसुध्दा देण्यात आला आहे.
सदर आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेसाठी कर्तव्य करण्याची मुभा राहिल . तसेच मुख्याधिकारी, नगर परिषद यवतमाळ यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना पासेस निर्गमित कराव्या. परवाना धारकांची यादी संबधित पोलिस स्टेशन अधिकारी यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावी. पोलिस स्टेशन अधिकारी यांनी नेमूण दिलेल्या ठराविक वेळेत परवाना व पासेस धारकांना आवश्यक सेवा पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सोशल डिस्टन्सिंगचे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, नगर परिषद यवतमाळ यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचा-यांमार्फत कराव्यत, असे आदेशात नमूद आहेत.
या आदेशांचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग  नियंत्रण अधिनियम 1890, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर नियम व कायदे यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी कळविले आहे.
०००००००००

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी