तात्पुरत्या निवारागृहात योगा व प्रार्थनेचे आयोजन




v  प्रशासनाने केली हजाराच्यावर नागरिकांची सोय
यवतमाळ, दि. 7 : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका मजूर वर्गाला बसला असून बाहेरचे अनेक मजूर व नागरिक यवतमाळ जिल्ह्यात अडकून पडले आहेत. या नागरिकांच्या राहण्याची व खाण्याची सोय प्रशासनाने जिल्ह्यातील 37  निवारागृहात केली आहे. कोरोनामुळे ओढावलेल्या या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी निवारागृहातील नागरिकांना योगा व प्राथनेच्या माध्यमातून मानसिकरित्या सक्षम करण्यात येत आहे.
अडकेलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात एकूण 37 तात्पुरते निवारे उभारले आहेत. बाहेर जिल्ह्यातील व बाहेरील राज्यातील एकूण 1085 नागरिकांची सोय प्रशासनाने या निवारा गृहात केली आहे. यात सर्वाधिक पुसद येथील बाबासाहेब नाईक इंजिनियरींग कॉलेज वसतीगृहात 282 नागरिकांची सोय, त्यानंतर पाटणबोरी, ता. केळापूर येथील रेड्डी कॉन्व्हेंटमध्ये 136 नागरिक , पुसद येथील फिजीकल एज्युकेशन होस्टेल येथे 104 नागरिक, घाटंजी येथील बालकृष्ण मंगल कार्यालयात 52 नागरिकांची सोय अशाप्रकारे इतरही निवारागृहात एकूण 1085 नागरिकांची राहणे व खाण्याची सोय करण्यात आली आहे.
केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथे असलेल्या रेड्डी कॉन्व्हेंटमध्ये थांबलेल्या नागरिकांच्या प्रत्येक खोलीसमोर चप्पल स्टँड ठेवण्यात आले आहे. येथे खेळण्याकरीता प्रशस्त मैदान उपलब्ध आहे. याशिवाय बातम्या बघण्याकरीता प्रोजेक्टरची सुविधा, जेवणाकरीता स्वतंत्र भोजन कक्ष, मोबाईलकरीता वाय-फाय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या निवारागृहात थांबलेले नागरिक खेळ व मनोरंजनासोबतच आध्यात्माचा आनंदसुध्दा घेत आहेत. सायंकाळी 6 च्या दरम्यान योगा, मेडीटेशन नागरिकांकडून करून घेतले जात आहे. तसेच ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ ही प्रार्थनासुध्दा घेण्यात येते. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक जिल्हाधिकरी भाग्यश्री विस्पुते, तहसीलदार सुरेश कव्हाळे, नायब तहसीलदार मोट्टेवार आदी यासाठी परिश्रम घेत आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी