सोशल डिस्टन्सिंगबाबत बँकेच्या ग्राहकांना अवगत करा - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

                           
                                   
v बँकेत अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 7 : महिन्याचे सुरवातीचे दिवस असल्यामुळे पेंशनर्स नागरिकांबरोबरच इतरही ग्राहक पैसे काढण्याकरीता बँकांमध्ये गर्दी करीत आहे. यात कलम 144 नुसार लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता एकमेकांपासून अंतर सुचना वारंवार शासन आणि प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यसाठी बँकेच्या अधिका-यांनी सोशल डिस्टन्सिंगबाबत ग्राहकांना अवगत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बँकर्सच्या प्रतिनिधींसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांच्यासह बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सध्या प्रधानमंत्री जनधन योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, ग्राहकांना ठराविक अंतरावर उभे राहण्यासाठी बँकांनी मार्किंग आखून द्याव्यात. एकही ग्राहक या मार्किंगच्या बाहेर उभा राहणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. तसेच लहान मुलांना बँकेत घेऊन येणा-या ग्राहकांना बाहेरूनच घरी जायला लावावे, अशा सुचना त्यांनी केल्या. यावेळी एम. राजकुमार म्हणाले, ग्राहकांना उभे राहण्यासाठी मार्किंग झिक-झॅक पध्दतीने आखावे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वयोवृध्द लोकांना जास्त आहे. त्यामुळे पेंशनकरीता त्यांना दहा-बारा एप्रिलनंतर बोलवावे. वर्ग – 4 च्या शिपायामार्फत बँकेच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंगबाबत लक्ष ठेवावे. ग्राहकांना एटीएम द्वारे पैसे काढण्यास सांगावे, असेही ते म्हणाले.
सध्या लॉकडाऊनच्या काळात बँकेत पैसे काढणे, पैसे जमा करणे, आरटीजीएस/ एनईएफटी व चेक डिपॉझिट करणे या अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या सेवा देण्यासाठी तसेच बँकेत गर्दी न होण्यासाठी जास्तीचे कॉऊंटर सुरू करण्यात आले आहेत. मास्क लावल्याशिवाय व साबणाने हात धुतल्याशिवाय कोणालाही बँकेत प्रवेश दिला जात नाही. जनधन योजनेतील ज्या ग्राहकांचे खाते आहे, त्यांनी ग्राहक सेवा केंद्रातील सेवेचा फायदा घ्यावा व बँकेत गर्दी करू नये व आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे प्रबंधक श्री. बहिरसेठ यांनी केले आहे.

खरीप कर्ज वाटपाबाबत सुक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन : खरीप हंगाम 2020-21 करीता 2250 कोटी रुपयांचा प्लॉन तयार करण्यात आला आहे. शेतक-यांच्या खरीप हंगामाला आता सुरवात होणार आहे. त्यामुळे बँकांनी शेतक-यांना कर्ज वाटण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. प्रत्येक बँकेच्या शाखानिहाय प्रत्येक दिवशी किती वाटप झाले, उद्दिष्ट किती देण्यात आले, बँकांनी किती काम केले. उद्दिष्टपूर्तीकरीता बँकांनी कोणते नवीन उपक्रम राबविले आदींची माहिती अपडेड स्वरुपात देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दिले.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी