दिव्यांग नागरिकांना जीवनावश्यक वस्तु व आरोग्य विषयक साहित्याचे वाटप





यवतमाळ, दि. 12 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात प्रशासन व सामाजिक संघटनांच्या मदतीने दिव्यांग नागरिकांना जीवनावश्यक वस्तु तसेच आरोग्य विषयक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
हालचाल न करू शकणा-या जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तुंची मदत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या आदेशान्वये नोडल अधिकारी म्हणून जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पंचायत समिती व नगर पालिका स्तरावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुका स्तरावर गटविकास अधिकारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तिंसोबत संपर्क करून समाजातील गरजू दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट, भोजन, आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहे.
या अंतर्गत आतापर्यंत जीवनावश्यक वस्तुअंतर्गत 5245 धान्याच्या किट, 426 कडधान्य किट, 4264 डाळ किट, 4153 तेलाचे पॅकेटस्, 5069 तांदूळ किट व 108 इतर वस्तुंच्या किट वाटप करण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विषयक साहित्यामध्ये 4594 सॅनिटायझर, 4170 मास्क, 1608 रुमाल,  5865 डेटॉल बॉटल, 2729 फिनाईन बॉटल करण्यात आले आहे. ही मदत स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती तसेच ग्रामपंचायतीचा 14 वित्त आयोग निधी तसेच 5 टक्के दिव्यांग निधीमधून करण्यात येत आहे.
संचारबंदीच्या काळात दिव्यांग व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याबाबत निर्माण होणा-या परिणामांची तिव्रता लक्षात घेऊन आवश्यक सोयीसुविधा व जीवनावश्यक वस्तु आदी बाबींकरीता आपात्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क साधण्यासाठी सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुका स्तरावर असलेल्या या सहाय्यता कक्षाकरीता एका कक्षप्रमुखाची नेमणूक करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तिंनी आपात्कालीन परिस्थीतीत आवश्यक सेवेसाठी खालील व्यक्तिंशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी