प्रतिबंधक उपाययोजनासाठी पुरेसा औषधसाठा
*साथरोगासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज
*पर्यायी औषधींची उपलब्धता
यवतमाळ, दि. 19 : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी संघटनेने पुरेशा प्रमाणात औषधसाठा नसल्याचे निवेदन देऊन असहकार आंदोलन पुकारले आहे. मात्र जिल्ह्यात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या गॅस्ट्रो, अतिसार आदी साथरोगाबाबत जिल्हा यंत्रणा सुसज्ज असून यावर प्रतिबंधक उपाययोजनांसाठी विविध औषधीसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
साथरोगासाठी लागणारी औषधी आणि उपलब्ध साठ्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या मागणीनुसार औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच हा औषधपुरवठा मागणीप्रमाणे करणे सुरू आहे. तसेच कोणत्याही प्राथमिक केंद्रात औषधसाठा नाही, अशी स्थिती नाही. मात्र वैद्यकीय संघटनेने मागणी केलेली फ्युराझोलीडीन आरोग्य विभागात कुठेही उपलब्ध नाही. या औषधीचे एक कोटी गोळ्या दर करारानुसार हाफकीन आणि डॅफोडील या दोन औषध कंपनीला पुरवठा आदेश 15 मार्च रोजीच देण्‍यात आला असून या कंपन्यांनी अद्यापपर्यंत पुरवठा केलेला नाही. मात्र या औषधीला त्याहीपेक्षा उच्च प्रतिच्या पर्यायी औषधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच अतिशय जिवनावश्यक औषधाचा साठा जिल्हास्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर पुरेशा प्रमाणात उपलबध आहे.
जिल्ह्यात जूनमध्ये पाच साथरोगाचे उद्रेक झाले. यातील चार साथरोग तुरळक आणि एक तीव्र होते. या उद्रेकांवर तात्काळ नियंत्रण करण्यात आले. आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून जनतेला योग्य ती आरोग्य सेवा पुरविणे आवश्यक आहे. जनतेच्या आरोग्याबाबत प्रशासन गंभीर असून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरून असहकार आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी