पांढरकवडा येथे शनिवारी मौखिक आरोग्य तपासणी
यवतमाळ, दि. 28 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रूग्णालयाच्या वतीने पांढरकवडा येथील उपजिल्हा रूग्णालयात शनिवारी, दि. 30 जुलै रोजी मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार या सप्ताहात पांढरकवडा येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा या वेळेत उपजिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दंत चिकित्सकाच्या माध्यमातून मोफत मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचा परिसरातील नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल