प्रत्येकानी आधार नोंदणी करावी
*जिल्‍हा प्रशासनाचे आवाहन
यवतमाळ, दि. 13 : नवजात बालकापासून ते वयोवृध्‍द नागरीकांपर्यंत ज्यांनी आधार नोंदणी केलेली नसेल त्या नागरीक, विद्यार्थी, विविध योजनांचे लाभार्थी, अंगणवाडीतील बालके यांनी आधार नोंदणी तातडीने करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
प्रत्‍येक नागरीकांना आपली स्‍वतंत्र ओखळ (यूआयडी) निर्माण करण्‍यासाठी आधार नोंदणी करण्‍याची  मोहिम राबविण्‍यात येत आहे. जिल्‍ह्यातील २६ लाख नागरीकांची आधार नोंदणी झालेली आहे. तर उर्वरीत तीन लाख पाच हजार नागरीकांचे आधार नोंदणी करण्‍याची प्रक्रिया जिल्‍हा प्रशासनाकडून युध्‍द पातळीवर सुरू आहे. तालुक्‍यात आधार नोंदणी करण्‍यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्‍यात आली आहे. त्‍याठिकाणी आधार नोंदणी करण्‍यासाठी संबंधितांनी ओळखपत्र, रहिवासी दाखला सोबत आणावा लागणार आहे. तसेच नागरीकांचे बोटांचे ठसे व डोळ्याच्‍या बुबुळांचा फोटो नोंदवून घेण्‍यात येणार आहे. नोंदणीनंतर नागरीकांना ई-आयडी पावती देण्‍यात येणार आहे. जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आपल्‍या बालकाची आधार नोंदणी नुकतीच केली. ही आधार नोंदणी महत्‍वपूर्ण बाब असल्‍याने प्रत्‍येक नागरीकांनीही आपल्‍या नवजात बालकांची आधार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.
अंगणवाडी बालके, शालेय विद्यार्थी, शासकीय योजनांचे लाभार्थी तसेच सर्वसामान्‍य नागरीकांची नोंदणी करण्‍यात येणार आहे. आधारकार्ड नोंदणीकरिता लागणारा अर्ज व कागदपत्रांची माहिती www.yavatmal.nic.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे ज्‍या नागरीकांनी अद्यापही आपली आधार नोंदणी केलेली नाही, त्‍यांनी आपली नावे गावातील ग्रामस्‍तरीय समितीकडे नोंदवित, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. तसेच गावातील ग्रामस्‍तरीय समित्‍यांनी आपल्‍या गावातील नागरीक, बालकांची आधार नोंदणी करण्‍यात आली नाही, याची माहिती संकलित करून तहसिलदार यांच्‍याकडे सादर करावी, त्यानुसार संबधित गावात आधार नोंदणीसाठी विशेष शिबिर घेण्‍यात येईल.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी