ध्वनीप्रदुषण नियमाकरीता प्रभारी अधिकारी प्राधिकृत
यवतमाळ, दि. 19 : मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या अंतर्गत ध्वनी प्रदुषण नियमाकरीता यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी किंवा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
ध्वनी प्रदुषण नियंत्रण कायद्यानुसार दिवसा औद्योगिक क्षेत्रात 75 डेसिबल, व्यापार क्षेत्रात 65, निवासी 55, दवाखाना, शाळा आणि धार्मिक ठिकाणी 50 डेसिबल तर रात्री औद्योगिक क्षेत्रात 70 डेसिबल, व्यापार क्षेत्रात 55, निवासी 45, दवाखाना, शाळा आणि धार्मिक ठिकाणी 40 डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीचा वापर झाल्यास संबंधिताविरूद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस