प्रकल्पासाठी जमिन आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव द्यावेत
यवतमाळ, दि. 29 : यवतमाळ प्रदेश प्रादेशिक योजनेत संबंधित विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पासाठी जमिन आरक्षित ठेवण्यासाठी प्रादेशिक नियोजन मंडळाचे कार्यालयातील सहाय्यक संचालक यांच्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि यवतमाळ प्रदेशची  स्थापना करण्यात आली आहे. यातील प्रादेशिक योजना एका वर्षाच्या आत शासनाच्या मंजुरीसाठी सादर करावयाच्या आहेत. यासाठी यवतमाळ प्रदेश प्रादेशिक योजनेत संबंधित विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पासाठी जमिन आरक्षित ठेवावयाची असल्यास गावाचे नाव, गट क्रमांक, आवश्यक क्षेत्रफळ, सात-बाराचा उतारा आदी माहिती तीन महिन्याच्या आत प्रादेशिक मंडळाच्या यवतमाळ येथील कार्यालयात सादर करावी, यासाठी शासनाने कालमर्यादा ठरवून दिली असल्याने यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी