जिल्ह्यात आजपर्यंत 435 मिमी पावसाची नोंद
यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्यामुळे यावर्षी 12 जुलै पर्यंत जिल्ह्यात 434.95 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 911.34 मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती.
जिल्ह्यात कालपर्यंत 384.38 मिलीमीटर पाऊस झाला. एका विसात 12 जुलै रोजी सकाळपर्यंत 50.58 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे. यवतमाळ 438 मिलीमीटर, बाभुळगाव 399, कळंब 255, आर्णी 484, दारव्हा 373, दिग्रस 489, नेर 425, पुसद 529, उमरखेड 466, महागाव 651, केळापूर 425, घाटंजी 492, राळेगाव 258, वणी 462, मारेगाव 349, झरीजामणी 464 मिलीमीटर पाऊस पडला आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी