कृषी विभाग पिक विमाचा अर्ज देणार
* विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहणार नाही
यवतमाळ, दि. 26 : यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंतप्रधान पिक विमा योजना खरीप 2016 च्या हंगामासाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभाग होण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2016 आहे. या योजनेमध्ये भाग घेणेसाठी आवश्यक असणारे अर्ज बँकेकडे उपलब्ध नसल्यास हे अर्ज कृषि विभागाकडून उपलबध करून देण्यात येणार आहे.
याबाबतच्या कृषी आयुक्तालयाचे निर्देशानुसार ज्या ठिकाणी विमा कंपनीकडून अर्ज उपलब्ध करून दिलेले नाहीत, त्या ठिकाणी कृषी विभागामार्फत विहित अर्जाचा नमुना उपयोगात आणून बिगर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी करून घेण्याच्यादृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत. तेव्हा बँकांनी याबाबतची नोंद घेवून त्याप्रमाणे कार्यवाही करावी, तसेच कोणताही शेतकरी विमा येाजनेमध्ये भाग घेण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता बँकांनी घ्यावी. कृषी विभागामार्फत विहित केलेला अर्जाचा नमुना वापरण्यासाठी बँकांना कळविण्यात आले असल्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद