वणीतील अकरावीच्या प्रवेशाचा प्रश्न मिटला
*माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केली प्रवेशाची व्यवस्था
यवतमाळ, दि. 28 : वणी येथील अकरावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील वंचित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची व्यवस्था माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केली आहे. शहरातील विविध महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची निर्देश देऊन प्रवेश देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा प्रश्न आता मिटला आहे.
अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक महाविद्यालय, एसपीएम उच्च माध्यमिक विद्यालय, वणी पब्लिक उच्च माध्यमिक विद्यालय, लायन्स उच्च माध्यमिक विद्यालय याठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित महाविद्यालयांना देण्‍यात आली आहे. या महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी यादीनुसार प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार शालेय शुल्क आकारून प्रवेशाची कार्यवाही करावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी