जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावीत प्रवेशाची संधी
*16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावे लागणार
यवतमाळ, दि. 29 : घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावीमध्ये प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांकडून प्रवेश परिक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. हे अर्ज दि. 16 सप्टेंबर पर्यंत स्विकारले जातील. तसेच ही प्रवेश परिक्षा रविवारी,  दि. 8 जानेवारी 2017  रोजी होणार आहे.
परिक्षेचे आवेदन पत्र आणि माहिती पुस्त‍िका माध्यमिक शिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात मोफत उपलब्ध आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी जिल्ह्यातील शासकीय किंवा मान्यताप्राप्त शाळेत पाचवीमध्ये सन 2016-17 या वर्षात शिकत असावा. विद्यार्थ्याने सन 2014-15, 2015-16 व 2016-17 मध्ये सलग इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी उत्तीर्ण केलेली असावी. विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2004 ते 30 एप्रिल 2008 च्या दरम्यान असावा. नवोदय विद्यालयात 75 टक्के जागा ग्रामीण विद्यार्थ्यासाठी राखीव असतील. 15 टक्के जागा अनुसूचित जाती, 7.5 टक्के जागा अनुसूचित जमाती आणि 3 टक्के जागा अपंग उमेदवारांकरीता राखीव राहतील. संपुर्ण भरलेला अर्ज विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिनांक 16 सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी