गॅस जोडणीचे दर प्रदर्शित करावेत
*जिल्हाधिकाऱ्यांच्या एजंसीना निर्देश
*दर्शनी भागावर फलक लावावा
यवतमाळ, दि. 15 : गॅस एजंसीधारक गॅस जोडणीसाठी आवश्यक असलेल्या उपकरणाचे गॅस कंपनीद्वारे ठरवून दिलेल्या दराचे फलक कार्यालयातील दर्शनिय भागात ऑईल पेंटने प्रदर्शित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
गॅस एजंसीधारक गॅसच्या किंमतीची माहिती कार्यालयात लावत नाहीत, अशा तक्रारी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे येत आहे. तसेच काही गॅस एजंसीतर्फे गॅस कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांकडून गॅस कनेक्शन व्यतिरिक्त अवांतर साहित्य खरेदी करण्यास भाग पाडून मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. याबाबतही ग्राहक संस्था आणि नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे सर्व गॅस एजंसीधारकांनी गॅस जोडणीसाठी आवश्यक असलेल्या उपकरणाचे गॅस कंपनीद्वारे निश्चित करून दिलेले दर ऑईल पेंटव्दारे गॅस एजंसीच्या कार्यालयात मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्शनिय भागात प्रदर्शित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल