जिल्हा न्यायालयात सोमवारी मोबाईल लोकअदालत
यवतमाळ, दि. 29 : ‘मोबाईल विधी सेवा-कम-लोकअदालत’ योजनेंतर्गत यवतमाळ येथील जिल्हा न्यायालयात सोमवारी, दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मोबाईल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. आर. शिरासाव यांच्या हस्ते मोबाईल लोकअदालतीचे उद्घाटन होईल. याचा नागरिकानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे सचिव एस. एम. आगरकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल