कळंब आयटीआयमध्ये मादक पदार्थ विरोधी दिन

यवतमाळ, दि. 5 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, प्रेरणा प्रकल्प, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे जागतिक मादक पदार्थ विरोधी दिनाच्या अनुषंगाने शनिवार, दि. 2 जुलै रोजी जनजागृती सप्ताहानिमित्त कळंब येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रम पार पडला.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या लिसन फर्स्ट या घोषवाक्याने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. शिल्प निदेशक ए. एन. नाळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गणेश सव्वालाखे, डॉ. संगिता भारतीया, श्री. गुल्हाने आणि श्री. गावंडे आदी उपस्थित होते.
यावेळी. डॉ. संगिता भारतीया यांनी मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणारे मुख आणि इतर रोगांबाबत माहिती दिली. तंबाखूमुळे आतडे आणि फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोग, ह्दयरोग होण्याची शक्यता असल्याने युवकांनी या व्यवसनांपासून दूर राहावे, असे आवाहन केले. श्री. सव्वालाखे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून मानवी शरीरावरील दुष्परिणामांची माहिती दिली. श्री. गुल्हाने आणि श्री. गावंडे यांनीही समाज आणि इतर घटकांवर होणारे परिणाम सांगितले. श्री. नाळे यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.
मोहित पोहेकर यांनी सूत्रसंचालन केले. सागर परोपटे यांनी आभार मानले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या संगणक प्रचालक अंजली रिठे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी