*विशेष लेख                            
आर्थिक संकटातून तारणारा
बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजार
पांढऱ्या सोन्‍याचा जिल्‍हा म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या जिल्ह्याला नैसर्गिक आपत्‍तीने ग्रासले. दुष्‍काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्‍यांना गर्तेतून बाहेर काढण्‍यासाठी, जिल्‍हयाला पुन्‍हा गतवैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने बळीराजा चेतना अभियानराबविण्‍यास सुरवात करण्‍यात आली. बघता-बघता या अभियानाने वर्षभरातच लोकचळवळीचे स्‍वरूप प्राप्‍त केले. जिल्‍हयातील प्रत्‍येक नागरिक या अभियानत सहभागी होउ लागला. शेतक-यांच्‍या हितासाठी झटू लागला. या संकल्‍पनेतून बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजारउदयास आली. शेतकरी काबाडकष्‍ट करून शेतमाल बाजारेपठेत विक्री करण्‍यासाठी नेल्‍यानंतर शेतक-यांना हमाली, दलाली देउन मोजकेच पैसे गाठीशी शिल्‍लक राहतात. त्‍यामुळे शेतक-यांनी आपल्‍या शेतात उत्‍पादीत केलेला शेतमाल विक्रीसाठी शेतक-यांना हक्‍काची जागा मिळावी यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयातच आठवडयातील मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवस बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजार भरविण्‍यास सुरवात झाली. तर याच जिल्‍हाधिकारी कार्यालयात एका शेतक-यांना एक दिवस शेतमाल विक्रीची सोयही जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह करून यांनी दिली. या बाजाराला ग्राहकांचा, अधिकारी व कर्मचा-यांचा मिळालेला प्रतिसाद पाहता जिल्‍हातील बेंबळा प्रकल्‍प कार्यालय, निळोणा प्रकल्‍प, रेमण्‍ड कंपनी, दिग्रस व राळेगाव तहसील कार्यालयासोबतच इतर शासकिय कार्यालये आणि महाविद्यालये, शाळेत हा बाजार आज भरवून शेतक-यांचे मनोधैर्य उंचावित आहे.
…..
स्‍कूल ऑफ स्‍कॉलरपासून सुरवात
शेतात मेहनत करून शेतकरी शेतमाल पिकवितो. बाजारात आल्‍यानंतर दलालमार्फत विक्री  करतो. यामध्‍ये विनाकारण शेतक-यांना आर्थिक नुकसानीला समोर जावे लागते. त्‍यामुळे शेतक-यांसाठी बळीराजा चेतना अभियानअंतर्गत स्‍कूल ऑफ स्‍कॉलरमध्‍ये बाजार भरविण्‍यात आला.  यात जिल्‍हाभरातील ३०चे वर  शेतक-यांनी शेतमालाचे स्‍टॉल लावण्‍यात आले. यात भाजीपाला, फळ, कडधान्‍य, तूर डाळ, सोयामिल्‍क, पनिर, धान्‍य, मसाले पदार्थ विक्रीसाठी ठेवण्‍यात आले होते. यामध्‍ये केवळ तीन तासात 80 हजार रूपयांचा शेतमाल विक्री करण्‍यात आला. तसेच विद्यार्थ्‍यांसाठी शेतउपयोगी माहितीपर पुस्‍तकांचे स्‍टॉलही लावण्‍यात आले. शेतक-यांना निव्‍वळ नफा तर मिळालाच सोबतच  विद्यार्थ्‍यांना शेतक-यांकडून थेट शेतमाल विक्रीचे संस्‍कार होउन शेतक-यांचे हित आणि विद्यार्थ्‍यांमध्‍ये सामाजिक बांधिलकी, व्‍यावहारीक दृष्‍टीकोन निर्माण होण्‍यास मोठी मदत मिळाली आहे.
…..
ना दलाली ना-हमाली थेट शेतमाल विक्री
जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बाजाराला ग्राहकांचा उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद पाहता आता अशाच प्रकारचा बाजार १६ ही तालुक्‍यातील तहसील, तालुका कृषी कार्यालय, पंचायत समिती यासाख्‍या तालुक्‍यातील शासकिय कार्यालयात हा बाजार भरविण्‍यात यावा, अशी मागणी शेतक-यांकडून होवू लागली होती. त्‍यामुळे शेतक-यांना आपल्‍या शेतमाल विक्रीसाठी एक दिवस हक्‍काची जागा मिळाली. यातून हमाल, दलाल यांच्‍यापासून मुक्‍तता मिळाली असून शेत-यांना थेट आर्थिक फायदाही होत आहे. शेतक-यांनी या बाजारातून भाजीपाला, फळे, धान्‍य, कडधान्‍य, दाळ, तीळ, गहू उत्‍पादीत शेतमाल विक्री करीत असून आतातर थेट ग्राहकही शेतक-यांकडून घरपोच शेतमाल मागविण्‍याची पध्‍दती सुरू झालेली आहे.
…..
रेमण्ड कंपनीत बाजाराचे आयोजन
शेतमाल खरेदी करता यावा यासाठी एमआडीसी परीसरातील  रेमण्ड कंपनीच्‍या परीसरात  दर मंगळवार बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजार भरविण्‍यात येत असून याठिकाणी १२ शेतक-यांचा 15 हजार रूपयांचा शेतमाल विक्री होत आहे . कंपनीमध्‍ये असलेले अडीच हजारांवर कर्मचारी या बाजारात येत असून  शेतक-यांचा शेतमाल बघता बघता एक तासात मालाची विक्री  कधी होते हे शेतक-यांनाही कळत  नाही.  कंपनीचे एचआर हेड प्रशांत दिघे, जनसंपर्क अधिकारी प्रेम टोलीवाल, एचआर मॅनेजर सी. एम. पातुरकर, संजीव पांडे, नितीन श्रीवास्‍तव, अजय शर्मा, अभियंता विजय पटेल, रणबिर मलीक, संजीव पांडे यांच्‍यासह अधिकारी व कर्मचारी यांच्‍या पुढकाराने या बाजाराचे आयोजन करण्‍यात येते.
.....
निळोणा प्रकल्‍पावर रविवारी बाजार उत्सव
 डीप निळोणा मिशनअंतर्गत जानेवारी ते मे याकालावधीत तलावातील गाळ काढण्‍यात आला.   याठिकाणी निळोणातील गाळ काढण्‍यासाठी वाढलेला लोकसहभाग पाहता याठिकाणी बळीराजा बाजार उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले. त्‍यामुळे शेतक-यांच्‍या शेतातील शेतमाल खरेदी करण्‍याची पर्वणीच शहरातील नागरिकांना मिळाली असून यातून जिल्‍हयातील बळीराजा बळकटी मिळाली.  बळीराजा चेतना अभियान व प्रयास यवतमाळ संकल्पित मिशन डिप निळोना अंतर्गत बाजार उत्‍सवाचे आयोजन दर रविवारी  सकाळी ८ ते ११ या वेळेत करण्यात येत होते. आपण आपल्या शेतकरी बांधवांचा थेट शेतमाल खरेदी केल्याचा आनंद, आपल्या पाल्याला बाजाराचा अनुभव, आपण ज्‍या प्रकल्‍पाचे पाणी पितो, त्या निळोना प्रकल्‍पाला भेट, निळोणा प्रकल्‍पाची माहिती असे अनेक उद्देश साध्य झाले. प्रकल्‍पावर भविरण्‍यात येणारा बाजार संपूर्ण प्लास्टिक केरी बॅग मुक्तीचा संदेश देणाराही ठरला.
…..
बेंबळा प्रकल्‍प कार्यालयाचाही पुढाकार
पाटबंधारे सांस्‍कृतिक भवनच्‍यामागे असलेल्‍या बेंबळा प्रकल्‍प कार्यालयात दर गुरूवार बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजाराचे आयोजन करण्‍यात येते. या कार्यालयात जवळापास सहाशेवर कर्मचारी या बाजारात सहभाग घेत असून शेतक-यांनी सेद्रिंय व साध्‍या पध्‍दतीने भाजीपाला, फळे, धान्‍य, कडधान्‍य खरेदी करतात.  शेतक-यांनी बेंबळा प्रकल्‍प कार्यालयातील खुल्‍या प्रांगणात स्‍टॉल लावण्‍यासाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आली असून  कार्यकारी अभियंता डि. जे. राठोड, व बाजाराचे आयोजक वरिष्‍ठ लिपिका पी. एस. सप्रे  यांनी शेतक-यांना व ग्राहकांना बाजारात सहभागी होण्‍याचे आवाहन करीत आहे.
…..
बाजाराला इस्‍त्रायल चमूची भेट
अभियानाअंतर्गत भरविण्‍यात येत असलेल्‍या बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजाराला अभ्‍यास दौ-यावर आलेल्‍या इस्‍त्रायल चमूने १७ जून रोजी भेट देउन बाजाराची माहिती घेतली. यावेळी चमूतील माशो प्रीवा, जोनाथन स्‍पेंसर, झीइव मेटॅलॉन, थोअव रॉथलर, गाबी नाकुम, आयला नाकुम यांना बाजाराचे महत्‍व सांगून शेतक-यांना जास्‍त नफा मिळावा हा या मागचा उद्देश असल्‍याचेही निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले. तसेच इस्‍त्रायल चमूने शेतक-यांकडून या भागातील पीक पध्‍दती, पिकांची माहिती, पालेभाज्‍या, फळे, धान्‍य व धान्‍याचे कुठले प्रकार कुठल्‍या हंगामात निघतात याची माहिती घेतली. तसेच शेतक-यांची संवाद साधून पिकांची लागवड कशा पध्‍दतीने करातात, त्‍यांची काढणी पध्‍दती कशी आहेत, शेतमाल विक्रीसाठी बाजाराची सुविधा कुठे आहेत याची माहिती शेतक-यांकडून जाणून घेतली.
.....
मा. मुख्‍यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडून कौतुक
अभियानाच्‍यावतीने ५ जूनरोजी महाआरोग्‍य शिबिराचे उद्घाटन करण्‍यासाठी मा. मुख्‍यमंत्री ना. श्री.देवेंद्र फडणवीस जिल्‍हयात आले होते. यावेळी बळीराजा चेतना अभियानाचे उपक्रम, राबविलेले कार्यक्रमांची माहिती देण्‍यात आली. यावेळी जिल्‍हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयात बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजार भरविण्‍यात येत असल्‍याचे जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. या अभिनव उपक्रमाची सविस्‍तर माहिती त्‍यांनी जाणून घेतली. यातून शेतक-यांना थेट नफा मिळत असल्‍याने बाजाराचे कौतुक करून शेतक-यांसाठी जिल्‍हयातील प्रत्‍येक शासकीय कार्यालयात एक दिवस बाजार भरवून शेतक-यांचे मनोधैर्य वाढविण्‍यासाठी महत्‍वाचा असल्‍याचे यावेळी बोलले.
.....
शाळेतील विद्यार्थ्‍यांच्‍या भेटी
जिल्‍हाधिकारी कार्यालयात भरत असलेल्‍या या बाजाराला शहरातील विविध संस्‍था, संघटना, शाळेतील विद्यार्थ्‍यांनी भेटी दिल्‍या. तसेच शेतक-यांचे मनोधैर्य वाढेल असे शेतक-यांच्‍या जिवनावर बोधीसत्‍व फाउंडेशनच्‍या वतीने पथनाटयांचे सादरीकरण करण्‍यात आले. यातून विद्यार्थ्‍यांना थेट शेतक-यांकडून भाजीपाला, फळे विकत घेत शेतक-यांशी संवाद साधला. विद्यार्थ्‍यांना यातून थेट शेतक-यांकडून शेतमाल खरेदीची आनंद मिळाला असून आम्‍हीही शेतक-यांसोबत असल्‍याचा संदेशच यातून विद्यार्थी देत आहे.
…..
शेतक-यांची भटकंती वाचली
जिल्‍हाधिकारी कार्यालयासोबतच इतर शासकिय कार्यालयात जिल्‍हयातील शेतक-यांना आपल्‍या शेतात उत्‍पादीत केलेल्‍या मालाला विक्रीसाठी हक्‍काची जागा मिळाल्‍याने शेतक-यांची भटकंती थांबली आहे. जिल्‍हयातील तालुक्‍यातून शेतकरी सेंद्रिय व साध्‍या पध्‍दतीने पिकविलेले धान्‍य, कडधान्‍य, भाजीपाला विक्रीसाठी आणत आहे. यातून शेतक-यांची हमाली व दलाली वाचत असून शेतक-यांना आर्थिक फायदा होताना दिसून येत आहे. शेतकरी महिलानांही दैनंदिन गरजेसाठी लागणारे गृहउपयोगी साहित्‍य विक्रीसाठी आणता येणार आहे.
…..
वर्षभरात 37 बाजारांचे वर्षभराचे नियोजन
शेतमाल थेट ग्राहकांनी खेरेदी करता यावा यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील परीसरात आठवडयातील दर शुक्रवारी ‘बळीराजा शेतमाल विक्री बाजार’ भरविण्‍यात  येत आहे. यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून ३१ डिसेंबर २०१६पर्यंतचे ३७ आठवडयांचे नियोजन तयार करण्‍यात आले आहे. शेतक-यांना कोषागार कार्यालयासमोरील जागा स्‍टॉल लावण्‍यासाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. तसेच स्‍टॉल लावण्‍यासाठी बळीराजा चेतना अभियान कक्षात नोंदणी करणे सुरू आहे.
                           २०१६ या वर्षात येणारे बाजार दिवस
अनु.क्र.
दिनांक
वार
अनु.क्र
दिनांक
वार
२२/४/२०१६
शुक्रवार
२०
०२/०९/२०१६
शुक्रवार
२९/४/२०१६
शुक्रवार
२१
०८/०९/२०१६
गुरुवार
०६/०५/२०१६
शुक्रवार
२२
१६/०९/२०१६
शुक्रवार
१३/०५/२०१६
शुक्रवार
२३
२३/०९/२०१६
शुक्रवार
२०/०५/२०१६
शुक्रवार
२४
२९/०९/२०१६
गुरुवार
२७/०५/२०१६
शुक्रवार
२५
०७/१०/२०१६
शुक्रवार
०३/०६/२०१६
शुक्रवार
२६
१४/१०/२०१६
शुक्रवार
१०/०६/२०१६
शुक्रवार
२७
२१/१०/२०१६
शुक्रवार
१७/०६/२०१६
शुक्रवार
२८
२७/१०/२०१६
गुरुवार
१०
२४/०६/२०१६
शुक्रवार
२९
०४/११/२०१६
शुक्रवार
११
०१/०७/२०१६
शुक्रवार
३०
११/११/२०१६
शुक्रवार
१२
०८/०७/२०१६
शुक्रवार
३१
१८/११/२०१६
शुक्रवार
१३
१५/०७/२०१६
शुक्रवार
३२
२५/११/२०१६
शुक्रवार
१४
२२/०७/२०१६
शुक्रवार
३३
०२/१२/२०१६
शुक्रवार
१५
२९/०७/२०१६
शुक्रवार
३४
०९/१२/२०१६
शुक्रवार
१६
०५/०८/२०१६
शुक्रवार
३५
१६/१२/२०१६
शुक्रवार
१७
१२/०८/२०१६
शुक्रवार
३६
२३/१२/२०१६
शुक्रवार
१८
१९/०८/२०१६
शुक्रवार
३७
३०/१२/२०१६
शुक्रवार
१९
२६/०८/२०१६
शुक्रवार



…..
बाजारात लाखवर उलाढाल
जिल्‍हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी भरत असलेल्‍या बाजारात जिल्‍हयातील जवळपास ४० शेतकरी व दर  मंगळवारी महाराष्‍ट्र शासन कृषि व पनन विभाग यांच्‍ये १०वर वाहनातून शेतक-यांच्‍या शेतमालाची विक्री करण्‍यात येते. यामध्‍ये शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्‍यासह परीसरातील ग्राहक शेतमाल खरेदीसाठी येत असून यातून दोन दिवसात लाखांवर उलाढाल होत आहे. शेतक-यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विक्री होत असून ग्राहकांनाही दर्जेदार भाजीपाला, फळे, धान्‍य मिळत आहे.
.....
 शेतक-यांना मिळाली हक्‍काची जागा
जिल्‍हयातील शेतक-यांना बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजारामुळे शेतक-यांची  व्‍यापारी, दलाली , हमाली यांच्‍यापासून मुक्‍तता झाली आहे. शेतक-यांना जिल्‍हाधिकारी व इतर शासकिय कार्यालयात शेतमाल विक्रीसाठी हक्‍काची जागा मिळाली. यातून शेतक-यांचे मनोर्धेर्य उंचावीत असून शेतक-यांचे होणारे आर्थिक शोशण अभियानामुळे टाळता येत आहे.
संजय राठोड, महसूल राज्‍यमंत्री तथा पालकमंत्री,  यवतमाळ  
.....
शेतक-यांना उत्‍कृष्‍ठ संधी
जिल्‍हयातील शेतक-यांना थेट ग्राहकांना धान्‍य, कडधान्‍य, भाजीपाला, फळ, भाजीपाला विक्रीतून फायदा होणार असून ग्राहकांनाही चांगला दर्जेदार शेतमाल मिळणार आहे. त्‍यामुळे शेतक-यांना आठवडयातून दोन दिवस आपल्‍या शेतमाल विक्रीची संधी मिळणार आहे. यातून शेतक-यांच्‍या थेट शेतमाल विक्रीची साखळीही तयार होणार आहे. त्‍यामुळे शेतक-यांनी शासकिय कार्यालयात आपले स्‍टॉल लावण्‍यासाठी तहसील कार्यालय आणि जिल्‍हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना अभियान कक्षात आपल्‍या नावाची नोंदणी करावी.
सचिंद्र प्रताप सिंह, जिल्‍हाधिकारी, यवतमाळ
.....
अभियानाच्‍या बॅनरखाली होणार विक्री
आठवडयातून दोन दिवशी शेतक-यांला जिल्‍हाधिकारी कार्यालयात तर इतर शासकिय कार्यालय परीसरात एक दिवस परीसरात शेतमाल विक्रि करता येणार आहे. आपल्‍याकडील दर्जेदार धान्‍य, भाजीपाला, फळे, कडधान्‍य हे बळीराजा चेतना अभियान या बॅनरखाली विक्रीची चांगली संधी शेतक-यांना अभियानाने उपलब्‍ध करून दिली असून शेतक-यांचा आत्‍मविश्‍वास निर्माण होण्‍यास मदत होत आहे. राजेश खवले, निवासी उपजिल्‍हाधिकारी, यवतमाळ
.....
शब्‍दांकन : नीलेश फाळके, यवतमाळ,
00000
फोटो ओळी
फोटो क्रमांक १ व २ : जिल्‍हाधिकारी कार्यालयात भरत असलेला बळीराजा थेट शेतमाल विक्री बाजार.  
फोटो क्रमांक ३ : रेमण्‍ड कंपनीत भरत असलेला बाजार.
फोटो क्र.४ व ५  : शेतक-यांचे बाजारात स्‍वागत करताना जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह.
फोटो क्र. ६,, ८ : इस्‍त्रायल चमूला माहीती देताना निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले.
फोटो क्र. ९ : पालकमंत्री संजय राठोड, जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह. .
फोटो क्र. १० : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी निळोना प्रकल्‍पावरील बाजाराला भेट दिली * सोबत पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी.
फोटो क्र. ११ : बळीराजा चेतना अभियानाचा लोगो.
फोटो क्र. १२ : स्‍कुल ऑॅफ मधील बाजाराला भेट देताना जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह.
फोटो क्र. १३ : शेती विषयक बुकस्‍टॉलची पाहणी करताना जिल्‍हाधिकारी सिंह.
फोटो क्र. १४ : बाजारामध्‍ये कृषी व पनन विभागाचे वाहन.
फोटो क्र. १५ : निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेश खवले.

00000














Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी