माजी सैनिकांसाठी सैनिक दरबाराचे आयोजन
यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अवलंबितांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अवलंबितांच्या काही अडीअडचणी असल्यास त्यांनी त्या लेखी स्वरूपात सर्व कागदपत्रांसह दुरध्वनी क्रमांक व पत्यासह दोन प्रतीमध्ये दिनांक 8 ऑगस्टपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दाखल करून टोकन प्राप्त करून घ्यावे. मुदतीनंतर अथवा ऐनवेळी दिलेल्या अर्जाचा विचार पुढील सैनिक दरबाराच्यावेळी करण्यात येईल. मोघम स्वरूपाच्या समस्यांचे निवेदन, तसेच न्याय प्रविष्ठ असलेली प्रकरणे सादर करू नये. जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अवलंबितांनी या दरबाराचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी