जिल्ह्यात धडक अतिसार नियंत्रण मोहिम
*झिंक गोळ्या, ओआरएसची वाटप
*नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 8 : जिल्हात धडक अतिसार नियत्रंण पंधरवाडा मोहिम दि. 11 ते 23 जुलै दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील लाभार्थींना झिंक गोळ्या आणि ओआरएस देण्यात येणार आहे. ही मोहिम योग्यरित्या राबविण्यासाठी गुरूवारी, दि. 7 जुलै रोजी जिल्हाधिकारी सच्चिंद्रप्रताप सिंह यांचे अध्यक्षतेखाली सभा घेतली.
भारतामध्ये 0 ते 5 या वर्षे या वयोगटातील एकूण बाल मुत्यूपैकी अतिसार व निमोनिया आणि त्यामुळे होणारे कुपोषण हे कारणीभुत आहेत. यासाठी ओआरएस आणि झिंग गोळ्यामुळे सहा टक्के आणि योग्य स्तनपान आणि पुरक आहारामुळे 15 टक्के, वॉश ॲक्ट‍िव्हीटीमुळे असे एकूण एक चतुर्थांश मृत्यू धडक अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहिमेत कमी करावयाचे शासनाचे धोरण आहे. या मोहिमेंतर्गत शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील 2 लाख 91 हजार 280 लाभार्थ्यांना 2 हजार 353 आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत भेटी देऊन गृहभेटीतून गोळ्या आणि ओआरएस वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात 3 हजार 200 ओआरटी कॉर्नर प्रत्येक अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयु दवाखाना, ग्रामीण रूग्णालय येथे 24 तास कार्यरत राहणार आहे. या मोहिमेत आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, गरोदर माता व स्तनदा मातांसाठी प्रात्यक्षिक व समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच निव्वळ स्तनपान व पुरक आहार याविषयी महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. कुपोषित बालकांना संदर्भ सेवा देण्यात येईल. तसेच हिरकणी कक्षाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येईल. सर्व शाळा, अंगणवाडीमध्ये हातधुवा मोहिम राबविण्यात येणार असून हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व आणि पद्धतीबद्दल माहिती देण्यात येणार आहे.
धडक अतिसार नियंत्रण  पंधरवाडा यशस्वीरित्या राबविण्यासाठी सहकार्य करावे, सअे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी