लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती
यवतमाळ, दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, संदीप महाजन, जिल्हा नाझर डी. जे. कडासने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनीही लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी