अनुसुचित जाती, जमातीतील उद्योजकासाठी योजना
यवतमाळ, दि. 12 : अनुसुचित जाती, जमातीतील युवकामध्ये उद्योजकता वाढीस लागावी, यासाठी प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे अनुसुचित जाती, जमातीतील उद्योजकाची निवड करुन त्यांना प्रारंभिक स्तरापासून उद्योग उभारणी ते उद्योग यशस्वीरित्या चालविणे तसेच त्यातून शाश्वतरित्या लाभ मिळेपर्यंत ही विशेष योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेसाठी सन 2016-2017 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक तालुक्यातील एका लाभार्थीची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 20 जुलै पुर्वी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ यांच्याकडे अर्ज सादर करावे. यासाठी इच्छुक उमेदवारांचे वय 18 वर्ष पुर्ण असावे. उद्योग उभारणीसाठी सहाय प्राप्त करण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा राहणार नसून अर्जदाराचे संबधित तालुक्यात जन्मस्थान असावे लागणार आहे. अर्जदाराकडे जात प्रमाणपत्र असावे, योजनेत सुक्ष्म व लघु नविन व्यवहार्य घटकाचा समावेश राहणार आहे. अस्तिवातील, जुन्या घटक योजना या योजनेत पात्र राहणार नाहीत. कुटुंबातील एकच सदस्य योजनेचे आर्थिक सहाय मिळण्यासाठी पात्र राहिल. डीआयसीसीआयमार्फत उद्योजकांना तांत्रिक सहाय आणि तयार मालाची विक्री करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. एस. मुद्दमवार यांनी कळविले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी