मोडी लिपीतील प्रशिक्षण वर्ग
यवतमाळ, दि. 15 : शासकीय कार्यालयात नोंदी असलेले मोडी लिपीतील कागदपत्राचे अधिकृतपणे वाचन व्हावे, यासाठी पुराभिलेख संचालयनालयातर्फे मोडी लिपीतील प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे. यासाठी यवतमाळ येथे 4 ऑगस्टपासून मोडी लिपीचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गात कर्मचारी, इतिहासाचे अभ्यासक, इतिहासप्रेमी नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण वर्ग दि. 4 ते 13 ऑगस्ट दरम्यान श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालय येथे दररोज सायंकाळी 4 ते 6 यावेळेत होईल. प्रशिक्षणार्थींना पुराभिलेख संचालनायातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी महाविद्यालयातील प्रा. श्री. जाधव यांच्याकडे  नाव नोंदणी करावी किंवा पुराभिलेख संचालनालय, एलफिन्स्टन महाविद्यालय इमारत, मुंबई येथे संपर्क साधावा. यात प्रथम येणाऱ्याना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुरभिलेख संचालनालय संचालक डॉ. दिलीप बलसेकर यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी