समाजकल्याण विभागाच्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
यवतमाळ, दि. 15 : सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहे. इच्छुकांनी 19 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक
राज्याच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिल्या जातो. महसूल विभागस्तरावर प्रत्येकी एक पुरस्कार दिला जाईल. पुरस्काराचे स्वरूप 15 लाख रूपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. या पुरस्कारासाठी संस्था 15 वर्षांपासून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात असावी. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने रूढी परंपरेविरूद्ध व अस्पृश्यतेविरूद्ध सामाजिक चळवळ उभारलेल्या भुमिहिन शेतमजूर कामगारांसाठी कार्य करणारे व्यक्ती आणि संस्थांना पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पुरस्कारासाठी पुरूषाचे वय 50 आणि महिलेचे वय 40 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच संस्था किमान 15 वर्षांपासून सामाजिक न्याय क्षेत्रात कार्यरत राहणे आवश्यक आहे. 51 हजार रूपये, स्मृतीचिन्ह शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यक्ती तसेच संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
संत रोहिदास पुरस्कार
हा पुरस्कार फक्त्‍ चर्मकार समाजकरीता असून या समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 50 वर्षे आणि महिलांचे वय 40 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे­. व्यक्तीकरीता पुरस्काराची रक्कम 21 हजार रूपये आणि संस्थेकरीता 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे असावा. व्यक्ती तसेच संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवाचे चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
या सर्व पुरसकारांसाठी विहित नमुन्यातील अर्ज समाज कल्याण कार्यालय येथे विनामुल्य उपलब्ध आहेत. पुरस्काराचे निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी दि. 19 जुलैपर्यंत आपला प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विजय साळवे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी