जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ग्रामस्तरावर समित्या नेमणार
- सचिंद्र प्रताप सिंह
 जिल्हास्तरीय जैवविविधता व्यवस्थापन समितीची बैठक
यवतमाळ, दि. 7 : जिल्ह्यात विविध प्रकारच्या जैविकविविधता आढळून येतात या विविधतेचे संरक्षण करण्यासोबतच त्याचा शाश्वत उपयोग व त्यापासून मिळणारा लाभ सुनिश्चित करण्यासाठी या जैवविविधतेचे संरवर्धन होणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामस्तरावर समित्या नेमणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय जैविकविविधता व्यवस्थापन समितीची पहिली बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा समितीचे अधिकृत गठनही करण्यात आले. बैठकीला उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, पुसदचे उपवनसंरक्षक कमलाकर धानवे, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक एम.आर.चेके, जीवन प्राधिकरणचे उपअभियंता श्री.दारव्हेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्तरावर काम होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामस्तरीय समित्या नेमण्यासोबतच तालुकास्तरीय समिती तसेच नगर परिषद क्षेत्रासाठी स्वतंत्र समित्या नेमण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या समित्या जैविक विविधतेचे संवर्धन, जैविक विविधतांचा सुयोग्य वापर,  वापरातुन प्राप्त होणाऱ्या लाभांचे  रास्त व समन्यायी वाटप यासाठी या समित्या काम करतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा व ग्रामस्तरावरील समित्यांमध्ये या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. जिल्हास्तरीय सदस्यांमध्ये सुक्ष्मजीव शास्त्र, औषधे व रसायने, पक्षी तज्ञ, जल, सिंचन तज्ञ या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश करण्याची सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केली.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी