आज आसोला येथे विशेष चर्मरोग तपासणी शिबिर
यवतमाळ, दि. 28 : पांढरकवडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्वचारोगाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आसोला येथे एक दिवसाचे विशेष चर्मरोग निदान शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार शुक्रवारी, दि. 29 जुलै रोजी हे शिबिर घेण्यात येणार आहे.
पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा, आसोली, करणवाडी, केळापूर आदी गावांमध्ये बुरशीजन्य आजाराची लागण झाली असल्याच्या तक्रारी आहे. या गावातील नागरीकांनी जिल्हाधिकारी यांची काल भेट घेऊन गावात त्वचारोगाचे विशेष शिबिर घेण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांच्याशी चर्चा करून या गावांमध्ये विशेष शिबिर घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बांगडे यांनी डॉ. अमर सुरजुसे, डॉ. सारस्त आणि डॉ. दुधाळकर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ विठ्ठल बुच्चे यांचे विशेष पथक तयार केले आहे. हे पथक संपूर्ण औषधसाठ्यासह शुक्रवारी आसोला येथे भेट देऊन संपूर्ण रूग्णांची तपासणी करणार आहेत. या रूग्णांना आवश्यकतेनुसार औषधांचेही वाटप याचठिकाणी करण्यात येणार आहे. या रूग्णांना आवश्यकता भासल्यास यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात आणून उपचार करण्यात येणार आहे.
या त्वचारोगाच्या संसर्गावर जिल्हाधिकारी लक्ष ठेऊन असून आसोला येथे झालेल्या शिबिराचा अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी अधिष्ठाता डॉ. बांगडे यांना दिल्या आहेत. या शिबिराचा परिसरातील नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल